मुंबई – राज्यात गेल्या काही महिन्यांत गावोगावी येणाऱ्या बिबट्याची दहशत हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक ह्या समस्येने त्रस्त असताना गोरेगावच्या न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबटयाचा वावर पाहायला मिळत आहे, हा बिबट्या कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 6 फुट उंच जाळी ओलांडून बिबटे सोसायटी परिसरात प्रवेश करित आहेत. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे येथील रहिवाशी लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण पसरले आहे.