Mumbai-Vijaydurg : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान (Mumbai-Vijaydurg) आशियातील सर्वात जलद एम-टू-एम रो-रो जलवाहतूक सेवा दि. 1 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर एम-टू-एम या रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात (Mumbai-Vijaydurg) आली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे सदर फेरीसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबईहून विजयदुर्ग येथे केवळ 6 ते 7 तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. सदर फेरीसेवेच्या आतापर्यंत एकूण 6 फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत. Mumbai-Vijaydurg मात्र सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून (Mumbai-Vijaydurg) मुंबईकडे परत येत असताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे जहाजाच्या एकूण 4 इंजिनांपैकी सध्या केवळ 1 इंजिन कार्यरत असून उर्वरित 3 इंजिनांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या अनपेक्षित तांत्रिक बिघाडामुळे सदर फेरीसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.