<form id="form1" action="SmartFlow.aspx" method="post"> मुंबई, दि. 3 – देशासह राज्यातही पुन्हा करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. त्यातच मुंबईतील करोनाबाधित रूग्णांची दैनंदिन संख्या हजारांहून अधिक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाइन शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी घेण्यात आला आहे.<br /> मुंबईमधील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत रविवारी तब्बल 8 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले होते.<br /> दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांनी सर्व संबंधितांची तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रत्येक जिल्ह्यात करोनाची काय परिस्थिती आहे. त्यानुसार शाळा संदर्भात काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात आली.</form>