Mumbai Rains : पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात मग कोट्यवधी रुपये गेले कुठे? – नाना पटोले
Updated On:

मुंबई – राज्यातील शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाज व जाहीरातबाज सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, ६ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला.
मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल देखील नाना पटोलेंनी केला आहे.





