१ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’चा टोल महागणार
Updated On:

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा टोल महाग होणार आहे. १ एप्रिलपासून टोलचे नवीन दर लागू होतील. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (MSRDC ) हा निर्णय घेतला. तसेच टोलवसुलीसाठी नवीन कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कारसाठी २३० रुपये टोल नागरिकांना भरावा लागतो मात्र नाविन दराप्रमाणे १ एप्रिलपासून नागरिकांना २७० टोल द्यावा लागणार आहे.
१ एप्रिलपासून असे असणार नवीन दर
कारसाठी २७० रुपये आहे.
मिनीबससाठी ४२० रुपये
बससाठी ७९७ रुपये
ट्रक टू ऍक्सलसाठी ५८० रुपये
तर अवजडवाहनासाठी १ एप्रिलपासून १८३५ रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे.




