Mumbai News : खळबळजनक ! भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावरून अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीच्या विरोधात एक मोठी कारवाई (Mumbai News) केली आहे. या कारवाईत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mumbai News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीच्या विरोधात एक मोठी कारवाई (Mumbai News) केली आहे. या कारवाईत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह एकूण ६ जणांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात (Mumbai News) एकच खळबळ उडाली आहे. अजित आचरेकर असे अटक करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
पहाटेच्या सुमारास DRI ची धडक कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने शनिवारी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर सापळा रचून ही धडक कारवाई केली. संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल ५ कोटी रुपयांपेक्षा (Mumbai News) जास्त मूल्याचे अवैध सोने आढळून आले. डीआरआयने सोने आणि संबंधित मुद्देमाल जप्त करत आचरेकर यांच्यासह इतर पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी भाजपचा पदाधिकारी
अटक करण्यात आलेला मुख्य संशयित अजित आचरेकर हा भाजप कामगार संघटनेचा चिटणीस असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरेकर यांनी जाहीर भाजप प्रवेश केला होता.
या प्रवेशानंतर पक्षाने त्यांच्यावर कामगार संघटनेत चिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती, असा दावा आता केला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचेच नाव या आंतरराष्ट्रीय तस्करीशी जोडले गेल्याने विरोधक आता यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय; सखोल तपास सुरू
जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे प्रचंड मूल्य पाहता, हे केवळ एक साधे प्रकरण नसून यामागे ‘आंतरराष्ट्रीय सोने तस्करी रॅकेट’ असण्याचा दाट संशय यंत्रणांना आहे. हे सोने नेमके कुठून आणले जात होते आणि ते मुंबईत कोणापर्यंत पोहोचवले जाणार होते, याचा तपास डीआरआय करत आहे.
या रॅकेटमध्ये आचरेकर आणि इतर ५ जणांशिवाय आणखी काही प्रभावशाली व्यक्ती, राजकीय नेते किंवा बड्या व्यापाऱ्यांचा (Mumbai News) सहभाग आहे का, या दिशेनेही तपास यंत्रणांनी आपला मोर्चा वळवला आहे. या मोठ्या कारवाईमुळे आगामी काळात सोने तस्करीचे अनेक मोठे दुवे आणि पडद्यामागची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






