Mumbai Municipal Corporation । मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं, त्यानंतर आज निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. महापालिका निवडणुकीच्या निवडणुकींपैकी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची राज्यात चर्चा झाली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक पार पडली. आता काही क्षणात मतमोजणीला सुरुवात झाली आहे . त्यात मुंबईत भाजप आणि शिवसेना यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याठिकणी सुरुवातीच्या कलानुसारदोन्ही पक्षाची समसमान आघाडी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबईचा महापौर कोणाच्या पक्षाचा होणार? मुंबईचा महापौर भाजपा-सेना युतीचा होणार की ठाकरे बंधूंच्या युतीचा होणार किंवा आणखी दुसऱ्या पक्षाचा होणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. Mumbai Municipal Corporation ।