Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र ! ‘त्या’ 6 खेळाडूंना रिटेन करत अनेक दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू

मुंबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंटरनॅशनल लीग टी-20 (आयएल टी-20) च्या चौथ्या मोसमासाठी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या स्पर्धेतील फ्रँचायझी, एमआय एमिरेट्सने कुसल परेरा, फजलहक फारुकी, मुहम्मद वसीम, रोमारियो शेफर्ड, टॉम बॅन्टन आणि एएम घझनफर यांना रिटेन केले आहे. याशिवाय, क्रिस वोक्स आणि कामिंदू मेंडिस यांना नव्याने संघात सामील करण्यात आले आहे. आयएल टी-20 च्या आयोजकांनी चौथ्या मोसमाच्या पहिल्या टप्प्यातील खेळाडूंची घोषणा केली आहे.
आयएल टी-20 मध्ये प्रत्येक संघ जास्तीत जास्त 23 खेळाडूंचा समावेश करू शकतो, यापैकी 8 खेळाडूंना रिटेन किंवा थेट विकत घेता येते. यंदाच्या मोसमात प्रथमच खेळाडूंचा लिलावही आयोजित होणार आहे. 4 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत 6 संघ एकूण 34 सामने खेळतील.
हे पण वाचा : यश दयालला अटक होणार? पोलिसांकडून ‘त्या’ प्रकरणात FIR दाखल
‘या’ दिग्गज खेळाडूंना दिला नारळ
दरम्यान, एमआय (Mumbai Indians) एमिरेट्सने निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, आंद्रे फ्लेचर, अकील हुसैन आणि अल्झारी जोसेफ यांसारख्या दिग्गज खेळाडूंना रिलीज केले आहे. विशेष म्हणजे, मागील मोसमात निकोलस पूरनने एमआय एमिरेट्सचे कर्णधारपद भूषवले होते. आयपीएल 2025 मध्ये पूरनने दमदार कामगिरी केली होती, तसेच टी-20 लीगसाठी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या रिलीजमुळे आयएल टी-20 मधील संघाची रणनीती चर्चेचा विषय ठरली आहे.





