Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने चाहत्यांना दिली गुड न्यूज; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. होम ग्राउंडवरील सामन्याच्या तिकिट बुकिंग वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई इंडियन्सचा होम ग्राउंडवरील अर्थात वानखेडे मैदानावरील पहिला सामना हा 31 मार्चला होणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध असणार आहे.
काय घेतला निर्णय?
घरच्या मैदानावरून प्रत्यक्ष सामना पाहण्याची वेगळीच मजा आहे. त्यामुळे चाहत्यांना हा आनंद देण्यासाठी मुंबई इंडियन्सने तिकीट घेण्याची वेळ ठरवली आहे. ही तिकीट विक्री तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. तिकीट विक्रीचा पहिला टप्पा 3 मार्चला दुपारी 4 वाजल्यापासून सुरु होईल. गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्य तिकीटं बूक करू शकतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 4 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिकीट विक्री होईल. यावेळी ब्लू सदस्यांना तिकीट दिली जातील. शेवटचा टप्पा 6 मार्चला सुरु होणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिकीटं सर्वांसाठी उपलब्ध असतील. ही तिकीट फक्त बूक माय शो या अधिकृत आयपीएल पार्टनर प्लॅटफॉर्मवरूनच बूक करता येणार आहेत.
मुंबई इंडियन्स बद्दल बोलायचे झाले तर हा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ समजला जातो. या संघाने आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे मागच्या वर्षी संघ गुणतालिकेत तळाशी राहिला होता.
आयपीएल 2025 मुंबई इंडियन्स संघ :
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंगे (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), श्रीजित कृष्णन (यष्टीरक्षक), बेवन-जॉन जेकब्स, नमन धीर, तिलक वर्मा. संघातील अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा आणि विघ्नेश पुत्तूर यांचा समावेश आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, रीस टॅपली, अश्वनी कुमार, कर्ण शर्मा, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर आणि लिजाद विल्यम्स.





