#IPL2020 : मुंबईचा सूर्य तळपला; राजस्थानसमोर 194 धावांचे लक्ष्य

आबूधाबी – सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान राॅयल्ससमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवलं आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर मुंबईने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 193 धावसंख्येपर्यत मजल मारली.
Innings Break!
After opting to bat first, #MumbaiIndians post a total of 193/4, courtesy some brilliant batting by SKY (79*)
Will #RR chase this down?#Dream11IPL #MIvRR pic.twitter.com/8Q8IUZRe9R
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
मुंबईकडून क्विंटन डी काॅक आणि रोहित शर्मा यांनी 49 धावांची सलामी दिली. क्विंटन डी काॅकला जोस टेलरकरवी झेलबाद करत कार्तिक त्यागीने ही जोडी फोडली. डी काॅकने 15 चे़डूंत (3 चौकार व 1 षटकार) 23 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सूर्यकुमारच्या साथीनं रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. संघाची धावसंख्या 88 असताना श्रेयस गोपलने राहुल तेवतियाकरवी रोहित शर्माला झेलबाद केले. रोहितने 23 चेंडूत (2 चौकार आणि 3 षटकार) 35 धावा केल्या. त्यापाठोपाठ फलंदाजीस आलेला ईशान किशनसुध्दा शून्यावर बाद होऊन माघारी परतला. ईशानला श्रेयस गोपलने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले.
त्यानंतर सूर्यकुमारने क्रुणाल पांड्याच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. क्रुणाल पांड्याने 17 चेंडूत 12 धावा केल्या. क्रुणाल पांड्याला जोफ्रा आर्चरने श्रेयस गोपाल करवी झेलबाद केले. त्यानंतर सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांनी फटकेबाजी करत शेवटच्या 6 षटकांत 76 धावा काढत संघाची धावसंख्या 193 पर्यंत नेली. सूर्यकुमारने 47 चेंडूत (11 चौकार व 2 षटकार) नाबाद 79 तर हार्दिक पांड्याने 18 चेंडूत (2 चौकार व 1 षटकार) नाबाद 29 धावांची खेळी केली.
राजस्थानकडून श्रेयस गोपलने 4 षटकांत 28 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.आर्चरने 4 षटकांत 34 तर त्यागीने 4 षटकांत 36 धावा दिल्या. टाॅम करनने 3 षटकांत 33 आणि राहुल तेवतियाने 2 षटकांत 13 धावा दिल्या.





