मुबंई – छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेतील आरोपी, स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईचा जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला आहे. नीरज देसाई हे देसाई डीडी देसाई कंपनीचे पार्टनर आहेत. कोसळलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट त्यांनीच केले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
Mumbai foot-over bridge collapse case: Esplanade Court rejects Structural Auditor Neeraj Desai's bail application. #Maharashtra
— ANI (@ANI) April 5, 2019
याघटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे तातडीने निश्चित करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता.