मालाडमध्ये बिल्डिंगचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना ! दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Updated On:

मुंबई : मुंबईतील मालाडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मुंबईतील मालाड परिसरात हजी बापू रोडवर नवजीवन इमारतीचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या ठिकाणी 20 मजल्याची निर्माणाधिन इमारत आहे. त्यातील एका घराचा भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप समोर आलेले नाही.





