Satara | दिलेल्या वचनांची अनेक पटींनी पूर्तता

ढेबेवाडी, (वार्ताहर) : पाटण मतदारसंघात भरीव विकासकामे करून, जनतेला दिलेल्या वचनांची अनेक पटींनी पूर्तता केली आहे. या मागे तुमचे आशीर्वाद व प्रेमाचे पाठबळ आहे.
यापुढेही हे पाठबळ कायम ठेवा, पाटण तालुका विकासामध्ये राज्यात अव्वल स्थानावर नेऊन दाखवतो, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून असवलेवाडी (ता. पाटण) येथे झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या विकासकामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असवलेवाडी ग्रामस्थांनी मुंबई येथे त्यांचा सत्कार केला. ना. देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील जनतेत सध्या विकासाचीच चर्चा असून आहे.
जे आहे, ते सर्व जनतेसमोर असल्याने उजळणी करण्याची गरज नाही. वाल्मिक पठारावरील दुर्गम गावे आणि वाड्यावस्त्यांना जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे व सुविधा निर्माण करण्यात आल्या असून, हा ओघ पुढेही राहील.
भीमराव असवले म्हणाले, ना. देसाई यांच्या माध्यमातून रस्ते, नळपाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी सुधारणा, पावणाईदेवी मंदिर संरक्षक भिंत आदी कामे झाली असून, या नेतृत्वाचा तालुकावासीयांना आभिमान आहे.
यावेळी मारुती असवले, लक्ष्मण कदम, शत्रुघ्न असवले, वसंत असवले, लक्ष्मण असवले, सत्यवान असवले, बळीराम असवले, राजेश असवले, सुभाष कंक, प्रकाश कंक, आकाराम बेबले, विश्वास असवले,
संतोष असवले, तुळशीराम असवले, शैलेश असवले, राजाराम असवले, प्रकाश जाईंगडे, बळीराम असवले, प्रल्हाद असवले, शांताराम बेबले, सुरेश असवले, दिनकर असवले, राजेश जाईंगडे, चाळके उपस्थित होते.




