प्रभात वृत्तसेवा पौड – कोंढावळे – शिर्केवाडा ( ता. मुळशी ) येथील गणेश तानाजी शिर्के यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पौड – आंबवणे विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना भोर विधानसभा संपर्क प्रमुख किसन टिकेकर यांच्या हस्ते गणेश शिर्के यांना नुकतेच नियुक्तीपञ देण्यात आले.गणेश शिर्के यांनी याआधी भारतीय विद्यार्थी सेना शाखा कोंढावळेचे शाखाप्रमुख तसेच भारतीय विद्यार्थी सेना मुळशी तालुका संघटक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच मुळशी तालुका संजय गांधी निराधार योजनेचीही त्यांच्याकडे काही काळ जबाबदारी होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले, तालुका प्रमुख सचिन खैरे, शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, उपतालुका प्रमुख दिलीप गुरव, युवासेना संघटक संकेत दळवी, पौडचे माजी सरपंच जगदीश लांडगे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीतीवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर गणेश शिर्के यांनी सांगितले.