मुलायम यांच्या संपत्तीत 5 वर्षांत 3 कोटींची घट

लखनौ – राजकीय नेत्यांच्या संपत्तीत वाढ होत असल्याचे चित्र सामान्यपणे आढळते. मात्र, समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव त्याला अपवाद ठरले आहेत. मुलायम यांच्या संपत्तीत 5 वर्षांत 3 कोटींहून अधिक घट झाली आहे.

मुलायम उत्तरप्रदेशच्या मैनपुरीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलायम यांनी संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानुसार, मुलायम यांच्या नावावर 16 कोटी 52 लाख रूपयांची संपत्ती आहे. मागील निवडणुकीवेळी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा ती 3 कोटी 20 लाख रूपयांहून कमी आहे. मुलायम त्यांचे पुत्र अखिलेश यांना 2 कोटी 13 लाख रूपये देणे लागतात. मुलायम यांच्या पत्नी साधना यादव यांच्या नावे 5 कोटींची संपत्ती आहे. मुलायम आणि त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न अनुक्रमे 32 लाख आणि 25 लाख रूपये इतके आहे. मुलायम यांच्या नावावर एकही वाहन नसल्याचेही प्रतिज्ञापत्रातील माहितीमुळे उघड झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.