नगर – मुळा धरणातील पाण्यात बुडून नगरमधील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पूजा गणेश सातपुते (वय-37), ओंकार गणेश सातपुते (वय-13) अशी त्यांची नावे असून ते नगर शहरातील बोरूडे मळा येथील आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
सातपुते कुटुंबातील तिघे जण रविवारी (दि.15) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पर्यटक म्हणून मुळा धरणाकडे गेले होते. गणेश सातपुते पाण्यात उतरले व गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा ओंकार पुढे गेला. तो पाण्यात बुडू लागला म्हणून त्याची आई मदतीस गेली. परंतु त्यामध्ये पूजा सातपुते व ओंकार सातपुते यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.