Mukhtar Ansari Death: माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर योगी आदित्यनाथ यांचे ‘ते’ भाषण व्हायरल

Mukhtar Ansari Yogi Adityanath : माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे निधन झाले आहे. बांदा कारागृहात त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्तारच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
माफियांवर मुख्यमंत्री योगी काय म्हणाले?
सत्तेत आल्यापासून माफिया, डॉन आणि गुंड सीएम योगींच्या निशाण्यावर आहेत. सीएम योगी यांनी अनेकवेळा गुन्हेगारांना गुन्हेगारी सोडून द्या अन्यथा राज्य सोडण्याचा इशारा दिला आहे. विधानसभेतही सीएम योगी यांनी “माफियाओं को मिट्टी में मिला देंगे”, असे भाषणात म्हणाले होते. आता मुख्तार अन्सारी याचे निधन झाल्याने मुख्यमंत्र्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत आहे व्हिडिओ –
व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेत बोलत आहेत की, मी सभागृहात सांगतोय. आम्ही या माफियाला जमीनदोस्त करू… आम्ही सर्व माफियांना जमीनदोस्त करण्याचे काम करू.” प्रयागराजमध्ये गोळीबारात एका वकिलाचा मृत्यू झाला तेव्हा सीएम योगींनी हे वक्तव्य केले होते. भरदिवसा घडलेल्या या हत्येने राज्यात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री योगी यांनी हे वक्तव्य केल्यावर विरोधकांनी यावरून सभागृहात गदारोळ केला होता.
फिर मैं कह रहा हूँ इस माफिया को मिट्टी में मिला देंगे….इसी हाउस में कह रहा हूँ मिट्टी में मिला देंगे—योगी आदित्य नाथ जी pic.twitter.com/d9iMpdUYkY
— Shivam Tyagi (Modi Ka Parivar) (@ShivamSanghi12) March 28, 2024
सीएम योगी यांचे वक्तव्य थेट अतिक अहमद च्या दिशेने असल्याचे मानले जात असले तरी, माफिया आणि डॉन मुख्तार याच्या मृत्यूनंतर त्यांचे वक्तव्य व्हायरल होत आहे. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बरेच राजकारण सुरू आहे. अन्नात विष मिसळले जात असल्याचा दावा अन्सारी यांनी केला असताना त्याची चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्तार अन्सारीच्या मुलानेही आपल्या वडिलांना अन्नातून स्लो पाॅयझन देऊन मारल्याचा आरोप केला आहे.
एकीकडे मुख्तारच्या मृत्यूनंतर काही लोक जल्लोष करत आहेत, तर काही जण कायदा आणि सुव्यवस्थेवर आणि सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे की, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक ठिकाणी एखाद्याच्या जीवाचे रक्षण करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. कारागृहात, पोलिस ठाण्यात, कोर्टात किंवा हॉस्पिटलच्या वाटेवर, खोटी चकमक किंवा अपघात दाखवून कैद्याचा मृत्यू झाल्यास, लोकांचा सरकार आणि न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडेल.



