MSRDC News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील दीर्घ प्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा (MSRDC News) लोकार्पण सोहळा पार पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या लिंकमुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास (MSRDC News) अधिक वेगवान, सुरळीत आणि सुसाट होणार असल्याचे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता आणखी एका भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. संपूर्ण महामार्ग १० पदरी करण्याचा निर्णय वाढत्या वाहतूक कोंडीला सामोरे जाण्यासाठी MSRDC ने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर संपूर्ण महामार्ग १० पदरी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सध्या सहा पदरी असलेल्या या महामार्गाला दोन्ही बाजूंनी अतिरिक्त लेन जोडण्यात येणार आहेत. MSRDC News या विस्तारीकरण प्रकल्पासाठी सुमारे ५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी साधारण १०० हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, भूसंपादनाचा सविस्तर प्रस्ताव MSRDC ने तयार केला आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिक विकासामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः सुट्ट्या, सणासुदी किंवा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बोरघाट परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी सततची डोकेदुखी बनली आहे. तज्ज्ञांच्या मते, महामार्गाचे १० पदरीकरण (MSRDC News) हा या समस्याावर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी तोडगा ठरेल. या विस्तारामुळे केवळ रस्त्याची क्षमता वाढणार नाही तर प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे आणि प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. ९० मिनिटांचा प्रवास ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि संपूर्ण महामार्ग १० पदरी झाल्यानंतर मुंबई ते पुणे अंतर केवळ ९० मिनिटांत कापता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पात केवळ अतिरिक्त लेन बांधणेच मर्यादित नसून, आधुनिक सुरक्षितता उपाययोजना, नवीन उड्डाणपूल (Flyovers), तांत्रिक सुधारणा, दर्जेदार रस्त्याचे बांधकाम आणि इतर आवश्यक सोयींचा समावेश करण्यात येणार आहे. MSRDC ची महत्त्वाकांक्षा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सातत्याने राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पानंतर आता १० पदरी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासातील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे कॉरिडार देशातील सर्वात आधुनिक आणि उच्च क्षमतेच्या एक्सप्रेसवेमध्ये सामील होईल, ज्याचा फायदा लाखो प्रवाशांना, व्यापार-उद्योगांना आणि पर्यटन क्षेत्राला होणार आहे.