MSEDCL bribery: सौर कृषी पंप योजनेच्या सर्वेक्षणासाठी शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. कृष्णा अश्रुबा पाळवदे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या तंत्रज्ञाचे नाव आहे. हेही वाचा – ‘या’ तारखेपासून उष्णता कमी होणार; भारतीय हवामान विभागाची महत्वाची माहिती पाळवदे हा महावितरणच्या तेलगाव उपविभागात कार्यरत आहे. सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी त्याने संबंधित शेतकऱ्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती. शेतकऱ्याने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यात पाळवदे याला लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.