MS Dhoni missed the entire IPL 2026 league stage : आयपीएल २०२६ च्या आपल्या शेवटच्या अत्यंत महत्त्वाच्या लीग सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना सुरू होताच, आयपीएलच्या इतिहासातील एक १८ वर्षे जुनी महान परंपरा खंडित झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, एमएस धोनी संपूर्ण हंगामात एकही लीग सामना न खेळता बाहेर राहिला आहे. दुखापतीमुळे धोनी संपूर्ण हंगाम मैदानाबाहेर राहणे हा चेन्नई सुपर किंग्ससाठी या मोसमातील सर्वात मोठा धक्का ठरला आहे. आधी पायाची दुखापत, नंतर अंगठ्याला फ्रॅक्चर; धोनी रांचीला रवाना हंगाम सुरू होण्यापूर्वीच प्री-सीजन कॅम्प दरम्यान धोनीच्या पायाच्या स्नायूंना गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला तो दोन आठवड्यांत परतेल अशी आशा चेन्नई व्यवस्थापनाला होती, मात्र ही दुखापत वारंवार उद्भवत राहिली. धोनीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामुळे दुखापत अधिकच बळावली. यानंतर लीग स्टेजच्या अखेरच्या टप्प्यात त्याच्या अंगठ्याला एक नवी दुखापत झाली. या दुखापतीनंतर धोनी सध्या आपल्या रांची येथील घरी परतला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, चेन्नईने प्ले-ऑफमध्ये धडक मारल्यास धोनी पुन्हा संघाशी जोडू शकतो, असे संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयपीएलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला – For the first time in IPL history, MS Dhoni hasn’t played a single match in a season. Thank you for all beautiful memories idolo @msdhoni 💛 pic.twitter.com/hEYUMHIwHi — ॐ🚩 (@Omii_07_Forever) May 21, 2026 एमएस धोनी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. यापूर्वी त्याने प्रत्येक हंगामात किमान १० पेक्षा जास्त सामने खेळले होते. मात्र, एकाही सामन्यात मैदानात न उतरता त्याचा लीग टप्पा संपण्याची ही पहिलीच वेळ आहे. धोनीने आतापर्यंत २७८ आयपीएल सामन्यांत ५,४३९ धावा केल्या असून आपल्या कप्तानीखाली चेन्नईला ५ वेळा चॅम्पियन बनवले आहे. हेही वाचा – Gujarat Titans Dominate : टीम इंडियात ‘गुजरात टायटन्स’चा बोलबाला! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तब्बल ११ खेळाडूंचा समावेश दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन (Playing 11): चेन्नई सुपर किंग्स: संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट, अंशुल कंबोज, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, मुकेश चौधरी, गुरजापनीत सिंग. गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशिद खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, अर्शद खान, मोहम्मद सिराज.