MPSC Success Story: हिंगोलीतील शेतकऱ्याच्या मुलाने कर सहाय्यक पदाला घातली गवसणी

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – ‘केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य होते. एक दिवस आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे, असे म्हणून योगेश चवरे ( yogesh chaware) याने अभ्यास करून एम.पी.एस .सी परीक्षा उतीर्ण (MPSC) होत कर सहाय्यक (tax assistant ) पदाला गवसणी घातली आहे. योगेश चवरे याने कर सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर साखरा गावातील ग्रामस्थांच्या वतीने गावात भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. (MPSC Success Story)
सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना पदरी अपयश पडतं तर काहींना यश मिळतं. हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या योशनेदेखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. (hingoli)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या 2022च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील योगेश बालु चवरे याने घवघवीत यश मिळवलं आहे. अधिकारी होण्याची इच्छा अनेक तरुणांनीची असतेअशा तरुणांसाठी योगेश चवरेची प्रेरणादायी कहाणी आहे. 2022ला त्याने परीक्षा दिली होती. त्याला 128 गुण मिळाले असून त्याची कर सहाय्यक पदी निवड झाली आहे.
योगेशच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्याचा नागरी सत्कारही करण्यात आला. या होतकरून लेकराने बापाचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न केले आहे.
योगेश सुरुवातीपासून शिक्षणात हुशार –
योगेशचे सुरुवातीचे शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. 10 वीनंतर 11 वी व 12 वी चे शिक्षण रिसोड येथील शिवाजी कॉलेजमध्ये घेतले. नंतर mpsc चे औरंगाबाद येथे क्लास केले व 2022 ला mpsc परीक्षा दिली. त्याने कर सहाय्यक परीक्षेत अनु.जातीतून राज्यात 11 वा क्रमांक मिळवला आहे. तर याचदरम्यान तो मंत्रालय लिपिक ही परीक्षादेखील तो उत्तीर्ण झाला आहे.
योगेशचे वडील अल्पभूधारक शेतकरी (smallholder farmer) आहेत. त्यांच्याकडे 3 एकर कोरडवाहू शेती आहे. बालु चवरे यांना दोन मुले आहेत. मंगेश चवरे आणि योगेश चवरे. दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले व आज दोन्ही मुलांनी बापाच्या कष्टाचे चिज केले. मोठा मुलगा आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि आता दुसरा मुलगा योगेश कर सहाय्यक झाला आहे.







