मुंबई – 11 ऑक्टोंबर रोजी नियोजित असलेली महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली.
तसेच परीक्षेची पुढची तारीख चर्चा करून घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.