Satara | प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलातर्फे खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार

सातारा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलातर्फे सुनेत्रा पवार यांची खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल बारामती येथे सेवादल प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावंघरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सातारा जिल्हा महिला सेवादल संघटिकाका लक्ष्मी कळंबे, कार्याध्यक्ष शिवाजीराव बनकर, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रमोद राजगुरू, पुणे सेवादल जिल्हाधक्ष सचिन गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष सुनील काळे, बारामती शहर सेवादल अध्यक्ष लालबिगे वकील, सातारा शहर अध्यक्ष मयूर जाधव, सातारा जिल्हा उपाध्यक्ष रामराव पिसाळ, प्रदेश संघटक राजेंद्र बुलूंगे, प्रदेश सचिव तुषार सोनमळे यांनी खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार केला.
यावेळी प्रशिक्षक अरुण माने ,रामराव पिसाळ, वर्षा कळंबे दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष प्रदेश संघटिक हिराताई पवार, लोणावळा संघटिका राजश्री गायकवाड, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष उपस्थित होते





