खासदार सुजय विखे पाटील यांना करोनाची लागण
Updated On:

अहमदनगर – भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात खासदार सुजय यांनी स्वत: माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. 30 डिसेंबर रोजी सुजय विखे पाटील यांचे वडील व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील करोनाची लागण झाली होती. करोना रिपोर्ट आल्यानंतर खासदार सुजय विलागीकरणात गेले आहे.
https://www.facebook.com/1437285613167585/posts/3160439404185522/
”आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे.काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.” अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.





