पुणे -करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी केवळ “कोव्हॅक्सिन’ डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोव्हॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. याशिवाय 10 जूनला कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे. त्या 18 वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.