MP Salary Hiked In India: केंद्र सरकारने खासदारांचा पगार 24% वाढवून आता 1 लाखाऐवजी 1.24 लाख रुपये प्रतिमहिना केला आहे. रोजचा भत्ताही 2000 वरून 2500 रुपये झालाय, तर माजी खासदारांची पेन्शन 25,000 वरून 31,000 रुपये झाली आहे. 2018 च्या फायनान्स ॲक्टनंतर दर 5 वर्षांनी महागाई निर्देशांकानुसार पगार वाढवला जाणार आहे. 1954 मध्ये किती मिळायचा पगार? 1954 मध्ये खासदारांना फक्त 300 रुपये पगार आणि 20 रुपये रोज भत्ता मिळायचा. 1955 मध्ये रेल्वेची पहिल्या दर्जाची तिकिटं मिळू लागली. 1966 मध्ये पगार 500 रुपये झाला, तर 1976 मध्ये मोफत हवाई सेवेची सुविधा सुरू झाली. 1983 मध्ये 50% वाढ होऊन 750 रुपये, आणि 1985 मध्ये 33% वाढून पहिल्यांदा 1000 रुपये झाला. पेन्शनही 300 वरून 500 झाली. अटल सरकारमध्ये मोठी झेप – 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने 167% वाढ करून पगार 4000 रुपये केला. 2001 मध्ये 200% वाढून 12,000 झाला. 2006 मध्ये मनमोहन सिंह सरकारने 33% वाढवून 16,000 केला. 2010 मध्ये यूपीएने 213% वाढवून 50,000 केला. मोदी सरकारने 2018 मध्ये पगार दुप्पट करून 1 लाख केला. आता 2025 मध्ये तो 1.24 लाख झाला आहे. तरीही काही राज्यांचे आमदार (झारखंड-2.88 लाख, महाराष्ट्र-2.61 लाख) खासदारांपेक्षा जास्त कमावतात.