CM शिंदेनी घेतलेल्या बैठकीबाबत खासदार कोल्हेनी व्यक्त केला खेद

Updated On:

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर हवेली मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत एक बैठक घेतली त्यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवा पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाबाबत बैठक घेतली मात्र या बैठकीला लोकांनी निवडून दिलेल्या आमदार,खासदार अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्याची खंत खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली.

केवळ राजकारण न करता शाश्वत विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन इथं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार खासदारांना बैठकीसाठी न बोलावणे हा लोकशाहीचा अपमान आहे. असं देखील कोल्हे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियावरून आपला एक व्हिडीओ प्रसारित करत आपले म्हणणे मांडले.

काय म्हणालेत खासदार कोल्हे नेमकं
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका सन 2020 मध्येच संपली, त्यावरून केलेली टीका म्हणजे वैचारिक दारिद्र्याचं लक्षण!
जेव्हा आपण राष्ट्रप्रथम म्हणतो, तेव्हा राष्ट्र आधी येतं आणि मग धर्म, त्यामुळे शंभूराजांना धर्मवीर पेक्षा स्वराज्यरक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक ठरते!
एकाही लोकनियुक्त प्रतिनिधींना न बोलावता बैठक घेऊन मुख्यमंत्री महोदय लोकशाहीत नवा पायंडा पाडू पहात आहेत, जे की बरोबर नाही!
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा विषय काळजाचा आहे, राजकारणाचा नाही! तरी कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन दुर्दैवी राजकारण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, ही विनंती!

आणखी संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि­णींसाठी खुशखबर; आता खात्यात जमा होणार ४५०० रुपये

2026-05-11 16:13:02

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि­णींसाठी खुशखबर; आता खात्यात जमा होणार ४५०० रुपये

Maval APMC Dismissed : अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त! मावळच्या सत्तासंघर्षाचा धक्कादायक शेवट

2026-04-16 02:30:15

Maval APMC Dismissed : अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त! मावळच्या सत्तासंघर्षाचा धक्कादायक शेवट

Indapur News : इंदापुरात राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व! सभापतीपदाच्या शर्यतीत 'या' ३ नावांची मोठी चर्चा..पाहा

2026-02-27 04:30:14

Indapur News : इंदापुरात राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व! सभापतीपदाच्या शर्यतीत 'या' ३ नावांची मोठी चर्चा..पाहा

Bhor Municipal Council : नगराध्यक्षांची सभा बेकायदेशीर? भोरमध्ये सत्ताधारी-विरोधक भिडले; बजेट रखडलं

2026-02-19 05:00:34

Bhor Municipal Council : नगराध्यक्षांची सभा बेकायदेशीर? भोरमध्ये सत्ताधारी-विरोधक भिडले; बजेट रखडलं

Wai Election Results : बावधन ते भुईंज... कुठे गुलाल उधळला अन् कुठे शांतता? पाहा वाईचा संपूर्ण निकाल

2026-02-10 00:15:43

Wai Election Results : बावधन ते भुईंज... कुठे गुलाल उधळला अन् कुठे शांतता? पाहा वाईचा संपूर्ण निकाल