#व्हिडीओ : विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Updated On:

पुणे – राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज विविध मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन केले आहे. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आधीपासून ग्रामसेवकाचे आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतीमधील कामकाज ठप्प झाले आहे. त्यात या कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.





