मायणीत पोलिस दलाचे संचलन

मायणी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व संवेदनशील असलेल्या मायणी येथील चांदणी चौकात पोलिसांकडून संचलनासह प्रात्यक्षिक करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत दहशत पसरवणाऱ्यांना चाप बसावा तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळांची परिस्थिती निर्माण न होता निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आज सोमवारी पोलिसांनी मायणी चांदणी चौकात संचलनाद्वारे प्रात्यक्षिक सादर केले.

या संचलनादरम्यान पोलीस उपनिरीक्षक धरनिधर कोळेकर यांनी निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले. कोणाच्याही दबावाला बळी न पडता नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करावे. सध्या आचारसंहिता असल्याने जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री जमाव जमवून गोंधळ माजवू नये तसे आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याच्या सक्त सूचना कोळेकर यांनी यावेळी दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.