नगर -नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे यांची महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य प्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
मंडळाचे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी डोंगरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नासीर शेख, प्रमोद मोरे उपस्थित होते. डोंगरे यांच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कार्याची दखल घेत नुकतीच त्यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना राज्याच्या कार्यकारणीवर संधी देण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.
नाना डोंगरे यांचे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन, जलसंधारण, प्रदूषणमुक्तीसाठी विविध उपक्रम चालू आहेत. मागील वीस वर्षापासून ते सामाजिक चळवळीत कार्यरत आहे. डोंगरे यांनी ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृती करुन विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.