आई राजा उदोऽऽ उदोऽऽ तुळजापूर सजलं; पहा डोळे दिपवून टाकणारी आकर्षक विद्युत रोषणाई

तुळजापुर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत व साडेतीन शक्ती पीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र

महोत्सवास लवकरच आरंभ होणार आहे. त्याच निमित्ताने मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाची तयारी जोरात सुरु आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाराज व जिजाऊ महाद्वार यासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ आणि ‘आई राजा उदो उदो’ असे विविध आकर्षक रोषणाईने लिहले आहे. सध्या मंदिरातील संपूर्ण परिसर सेल्फी पॉईंट ठरत आहे.

पुण्यातील श्री देविभक्त उंडाळे व टोळगे बंधुची श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा असल्याने गेल्या 7 वर्षांपासून ही मंडळी मंदीर परिसरात आकर्षक रोषणाई सेवा म्हणून देवीच्या चरणी अर्पण करतात. या वर्षी देखील ही परंपरा अखंडित चालू ठेवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.