आई म्हणजे आई असते…; मुलाला वाचविण्यासाठी 50 वर्षीय आईने केले असे काही…

परळी – किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 29 वर्षीय मुलाला आपच्याच आईने किडनी देऊन पुन्हा जीवनदान दिले आहे. शहरातील परळी वैजनाथ मधील माणिकनगर भागातील 50 वर्षीय आईने किडनी दिली आहे. औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी रोपणची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
स्वानंद श्रीधर बोकन,वय २९ असे मुलाचे नाव असून शकुंतला श्रीधर बोकन, वय ५० असे किडनी दान करणाऱ्या महिलेचे नाव आहे. स्वानंद हा 2016 पासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यांची किडनी निकामी झाली असून त्यांने पुणे येथे उपचार घेतले. दरम्यान त्यास किडनीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याच्या आईनेच किडनी देण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी रोपणची शस्त्रक्रिया डॉ. श्रीगणेश बर्मेला, डॉ. अजय महाजन, डॉ. अरूण चिंचोले यांनी यशस्वी केली. या शस्त्रक्रियेसाठी धनंजय मुंडे यांनी आपल्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन लाख रुपये दिले आहेत.





