मुंबई – बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार ही चर्चा नेहमीच सुरू असते. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं जातं. त्यावर तो थातूरमातूर उत्तर देऊन वेळही मारून नेतो. अनेक अभिनेत्रींशी सलमान खान याचं नावही जोडलं गेलं पण त्यापैकी कोणाशीही अद्याप त्याचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्याच्या लग्नाविषयीचं कुतुहुल कायम वाढत जातं.
मात्र यावेळी एका जुन्या मुलाखतीत त्याचा व्हिडियो क्लिप मध्ये त्याने सलमानने जुही चावलाशी लग्न करणाबाबतची इच्छा सांगितली आहे. या व्हिडियोमध्ये तो जुहीची प्रशंसादेखील केली होती.
View this post on Instagram
सलमान या व्हिडियोमध्ये म्हणाला की“जुही खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे. मी तिच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. मात्र त्यांनी मला नकार दिला”,
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला, ‘जुहीच्या वडिलांनी का नकार दिला असं विचारल्यावर त्याने पुढे म्हटलं, “कदाचित त्यांना मी योग्य वाटलो नसेन.” सध्या ही व्हिडियो क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. जुही चावला