Moscow Plane Crash : मॉस्कोला जाणारे भारतीय विमान अफगाणिस्तानच्या बदख्शानमधील वाखान भागात कोसळल्याची बातमी समोर येत आहे. अफगाण मीडियाने ही माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानच्या स्थानिक टेलिव्हिजन चॅनेल टोलोन्यूजने प्रांतीय माहिती आणि संस्कृती विभागाचे अधिकारी जबिहुल्ला अमीरी यांच्या हवाल्याने आज ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की उत्तर अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात एक प्रवासी विमान कोसळले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातग्रस्त विमानाबाबत कुरण-वा-मुंजन जिल्ह्यातील तोफखाना भागात एक टीम पाठवण्यात आली आहे. दरम्यान, हे विमान कोणत्या भारतीय प्रवासी कंपनीचे आहे, याविषयी अजून माहिती मिळू शकलेली नाही.
या दुर्घटनेचे कारण अद्याप समोर आलेली नाही. अफगाणिस्तानी मीडियाने विमान अपघाताची माहिती दिली आहे. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.