Morning Routine: आजच्या धावपळीच्या जीवनात सतत थकवा, आळस आणि कमी ऊर्जा जाणवणं ही सामान्य समस्या झाली आहे. घर आणि ऑफिसच्या चार भिंतींमध्ये अडकून राहिल्यामुळे शरीराला पुरेसं नैसर्गिक प्रकाश मिळत नाही. याचा थेट परिणाम म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या समस्येवरचा सगळ्यात सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय म्हणजे सकाळच ऊन. सूर्योदयाच्या वेळी पडणाऱ्या हलक्या उन्हांमध्ये अवघे १५ मिनिटं बसलात, तरी शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत सूर्यकिरण हे व्हिटॅमिन डीचे सर्वात मोठे नैसर्गिक स्रोत आहेत. सकाळच कोवळ ऊन त्वचेवर पडल्यावर शरीरात व्हिटॅमिन डी तयार होऊ लागतं. यामुळे हाडं मजबूत होतात आणि कॅल्शियम योग्यरीत्या शोषलं जातं. तणाव कमी होतो, झोप सुधारते सकाळच्या उन्हात बसल्याने शरीरात सेरोटोनिन (हॅपी हार्मोन) वाढतो. त्यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. यासोबतच झोपेचं चक्र नियंत्रित राहतं, ज्यामुळे रात्री शांत आणि गाढ झोप लागते. मेटाबॉलिज्म आणि ऊर्जा वाढते तज्ज्ञांच्या मते, सकाळच ऊन पचनशक्ती सक्रिय करतात. त्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारतो आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. रक्ताभिसरण सुधारल्याने ऑक्सिजन आणि पोषक घटक शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात. ऊन घेण्याची योग्य वेळ सकाळी ७ ते १० वाजेदरम्यानच ऊन सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. या वेळेत अतिनील (UV) किरणांचा धोका कमी असतो. रोज १० ते २० मिनिटं उन्हात बसणं किंवा थोडं चालणं पुरेसं ठरतं. विशेषतः हिवाळ्यात सकाळच्या उन्हांचं महत्त्व अधिक वाढतं. ही एक नैसर्गिक, मोफत आणि प्रभावी पद्धत आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. म्हणूनच, आजपासूनच आपल्या दिनक्रमात १५ मिनिटांची सकाळची सन बाथ जरूर समाविष्ट करा आणि आरोग्य सुधारण्यासाठी औषधांवरील अवलंबन कमी करा.