बांगलादेशी समजून ओडिशातील 300 हून अधिक मजुरांना कोंडून ठेवले, पोलिसांनी केली सुटका

कोलकाता – पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशातील 300 हून अधिक लोकांना मेदिनीपूरमध्ये स्थानिक लोकांनी ओलीस ठेवले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली, त्यानंतर बुधवारी 300 हून अधिक लोकांची बंदिवासातून सुटका करून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पश्चिम बंगालच्या मेदिनीपूरमध्ये कथितपणे ओलीस ठेवण्यात आलेले 300 हून अधिक लोक पोलिसांच्या मदतीने सुरक्षितपणे त्यांच्या घरी परतले आहेत. ओडिशात पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कामगारांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील या स्थलांतरित कामगारांना बांगलादेशी नागरिक समजण्यात आले.
ओलीस हे बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील –
मिळालेल्या माहितीनुसार, बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील हे लोक केशपूरच्या खारीका गावात स्थानिक डॉक्टरकडे उपचारासाठी गेले होते आणि परतत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार म्हणाले की, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सर्व लोकांची सुटका करण्यात आली आणि ओडिशात सुखरूप पोहोचले.





