नवी दिल्ली : देशात करोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी नुकतीच एकूण रुग्ण संख्येने एक कोटींचा टप्पा पार केलेला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ६२४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, याच कालावधीत देशात २९ हजार ६९० जण करोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ३१ हजार २२३ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
India records 26,624 new COVID-19 cases, 29,690 recoveries, & 341 deaths in the last 24 hours, as per Health Ministry.
Total cases: 1,00,31,223
Total recoveries: 95,80,402
Active cases: 3,05,344
Death toll: 1,45,477 pic.twitter.com/JWFahf7s5Q
— ANI (@ANI) December 20, 2020
देशात सध्या ३ लाख ५ हजार ३४४ अॅक्टिव्ह केसेस असून, ९५ लाख ८० हजार ४०२ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात १ लाख ४५ हजार ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे.
देशात एका महिन्यात जवळपास १० लाख जणांना करोनाची लागण झाल्याने, देशातील करोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला. असे असले तरी करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असून ९५.५० लाख जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.