लवकरच आणखी नवीन आर्थिक सुधारणा
Updated On:

निर्मला सीतारामन यांचे सुतोवाच
नवी दिल्ली : भारताला आकर्षक गुंतवणुक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच आणखी काही नवीन आर्थिक सुधारणा केल्या जातील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
आज भारत-स्वीडन व्यवसाय परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की या आधी सरकारने कार्पोरेट टॅक्स कमी करणे वगैरे सारख्या उपाययोजना केल्या आहेत. यापेक्षाही काही नवीन आर्थिक सुधारणा आमच्या अजेंड्यावर आहेत.
त्यात बॅकिंग, विमा क्षेत्र, खाण उद्योग इत्यादी क्षेत्रातील सुधारणांचा समावेश आहे. स्वीडीश संस्थांनीही भारतातील पायाभूत विकास क्षेत्रात गुंतवणुक करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील पाच वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्रात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा सरकारचा प्रस्ताव आहे.
टॅग्स:




