Mood Swings: महिलांमध्ये पीरियड्सदरम्यान मूड स्विंग होणे ही खूप सामान्य गोष्ट मानली जाते. पण अनेकदा याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, पीरियड्सच्या काळात होणारे हार्मोनल बदल महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे सतत चिडचिड होणे, अचानक रडू येणे, खूप उदास वाटणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय मूड बदलणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. पीरियड्सदरम्यान शरीरात इस्ट्रोजेन आणि इतर हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. याच बदलांमुळे महिलांच्या भावना आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. काही महिलांना या काळात खूप तणाव जाणवतो, तर काहींना एकटेपणा किंवा नैराश्यही जाणवू शकते. काही वेळा ही परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की महिलांच्या मनात नकारात्मक विचारही येऊ शकतात. (Mood Swings) मूड स्विंग होण्यामागे फक्त हार्मोन्सच कारणीभूत नसतात, तर शारीरिक त्रासही त्यामागे महत्त्वाचा असतो. पीरियड्समध्ये पोटदुखी, कंबरदुखी, अंगदुखी, ब्लोटिंग आणि थकवा यामुळे महिलांना अस्वस्थ वाटते. यामुळे चिडचिड वाढते आणि मानसिक ताणही जाणवतो. Mood Swings किशोरवयीन मुलींमध्येही ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. साधारण १० ते १५ वयात मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. त्या वयात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मुलींचा मूड वारंवार बदलू शकतो. नवीन शारीरिक बदलांशी जुळवून घेताना त्यांना मानसिक तणावही जाणवू शकतो. डिलिव्हरीनंतरही महिलांमध्ये मूड स्विंग दिसून येतात. झोप कमी होणे, थकवा आणि नव्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तसेच ४० ते ४५ वयानंतर मेनोपॉजच्या काळातही हार्मोनल बदलांमुळे महिलांचा मूड सतत बदलू शकतो. (Mood Swings) मूड स्विंगची काही सामान्य लक्षणे म्हणजे सतत थकवा जाणवणे, शरीरात ऊर्जा कमी होणे, भूक खूप वाढणे किंवा कमी होणे, नीट झोप न लागणे, बेचैनी, उदासी, गोष्टी विसरणे आणि आत्मविश्वास कमी होणे. तज्ज्ञांच्या मते, या काळात महिलांनी स्वतःची मानसिक आणि शारीरिक काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आनंदी वातावरणात राहणे, तणाव कमी ठेवणे, चांगला आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर ठरते. फळे, भाज्या आणि पौष्टिक अन्न खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच योग, ध्यान किंवा मॉर्निंग वॉक केल्याने मन शांत राहण्यास मदत होते. पीरियड्सदरम्यान होणारे मूड स्विंग ही सामान्य गोष्ट असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य काळजी घेतल्यास महिलांना या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते.