यंदा अंदमानमध्ये ‘या’ तारखेला मान्सूनचे होणार आगमन? ; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon 2024 । मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत वळीवाचा पाऊस पडतोय. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात काल तर वादळी वाऱ्याने १४ जणांचा बळी घेतला. दरम्यान, या वातावरणावरून सर्वांना वेध लागले ते म्हणजे आता मान्सूनचा पाऊस कधी येणार ? याचे. तर आता पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 19 मे च्या जवळपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मान्सूनच्या आगमनाची तारीख अजून जाहीर नाही Monsoon 2024 ।
हवामानशास्त्र विभागाकडून अजून मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या वातावरणाचा अंदाज पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे.
दरवर्षू मान्सूनचा पाऊस 21 मे च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. मात्र, यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते.
कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता Monsoon 2024 ।
परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. परंतु, यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.





