‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगने शेअर केले की तिला वाटते की फोटोग्राफर कधी कधी वॉर्डरोब खराब होण्याची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते सोशल मीडियावर सनसनाटी फोटो पोस्ट करू शकतील. अधिकाधिक महिलांनी अशा गोष्टींविरोधात उभे राहावे अशी तिची इच्छा असल्याचेही तिने सांगितले. मोना सिंह म्हणाली, ‘तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा किंवा कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला जा यावेळी कलाकारांच्या कपड्यांचे अशा काही अँगलने फोटो क्लिक केले जाते आणि या फोटो किंवा व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल केले जाते. या व्हिडिओचा सर्वांनी विरोध केला पाहिजे. सतत अशी भीती असते की पापाराझीं आपला चुकीच्या अँगलने फोटो तर नाही घेत आहे ना ‘ असे म्हणत तिने संताप व्यक्त केलं आहे. यापूर्वी, जान्हवी कपूर आणि कलाकारांनीही पापाराझींच्या नको त्या अँगलने व्हिडिओ आणि फोटो काढण्याचा विरोध होता. जान्हवी याबाबत सांगितले की, ‘ते तुमचा एक सामान्य व्हिडिओ घेतील परंतु कव्हर फोटोमध्ये ते चुकीच्या अँगलने फोटो टाकतील, जे सर्वात सनसनाटी दिसते कारण ते क्लिकबेट आहे, विशेषतः जेव्हा ती मुलगी असेल. मला आत्मविश्वासाने चालताही येत नाही कारण माझ्या मनात सतत विचार असतो, ‘काळजी घ्या, तुमचा फोटो चुकीच्या कोनातून काढला जाऊ शकतो.’ असं म्हणत अभिनेत्रीने भीती व्यक्त केली होती.