Rajkumar Rao Post : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावची आई कमलेश यादव यांची १० वी पुण्यतिथी असून अभिनेत्याने आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आईला अभिनेत्याने आपली सर्वांत चांगली मैत्रीण म्हटले आहे. राजकुमार रावने आईची आठवण काढत इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने “आई, तुला जाऊन १० वर्षे झाली आहेत. पण मला तुझी दररोज आठवण येते. तू मला शिकवलेली तत्वे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन चालणार.” असे म्हटले आहे. पुढे अभिनेता म्हणतो, “मी नेहमीच तुला माझा खूप अभिमान वाटावा असा प्रयत्न करेन, कारण मला माहित आहे की तू नेहमीच माझ्यासाठी आहेस. सर्वोत्तम आई असल्याबद्दल आणि माझी सर्वात चांगली मैत्रिण असल्याबद्दल धन्यवाद. मी तुला खूप प्रेम करतो.” अशा शब्दांत राजकुमार रावने आईवर प्रेम व्यक्त केले आहे. View this post on Instagram A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao) राजकुमार रावने अनेकदा त्याच्या मुलाखतींमध्ये आईची आठवण काढली आहे. आईच्या निधनानंतर (२०१६ मध्ये) अनेक मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने आईविषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तिच्याबद्दल बोलले आहे. आई कमलेश यादव यांचे १० वर्षांपूर्वी २०१६ मध्ये निधन झाले. त्यावेळी राजकुमार राव “न्यूटन” चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे वृत्त आहे. राजकुमार रावच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. राजकुमारची पत्नी पत्रलेखाने “आई ” अशी कमेंट केली आहे. हुमा कुरेशीने, “तुला खूप प्रेम पाठवत आहे.” अर्चना पूरण सिंग, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, फरहान खान आणि गौरव गेरा या सर्वांनी राजकुमारच्या भावनिक पोस्टमध्ये हृदयाचे इमोजी कमेंट केले आहेत. राजकुमारच्या वर्कफ्रंटबद्दल अभिनेता राजकुमार राव बॅालिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी आहे. त्याने आजवर अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. या वर्षात त्याचे अनेक प्रोजेक्ट अॅानफ्लोअर आहेत. वकील उज्ज्वल निकम यांच्यावर तयार करण्यात येणाऱ्या बॅायकोपिकमध्ये तो दिसणार आहे. त्याच्या २०२५ मध्ये भुल चुक माफ आणि मालिक या दोन चित्रपटांना चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. हेही वाचा : Sanjay Raut And PM Modi : “पंतप्रधान मोदी मोठे संशोधक, त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा…”; संजय राऊतांचा खोचक टोला