पुणे: महिलेचा विनयभंग करुन तीला जबरदस्तीने हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका हॉटेलचालकासह तीघांविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका चाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार ती आंबेगाव बुद्रुक येथील हॉटेल शिवारसमोर रात्री साडेदहा वाजता दुचाकीचे पंक्चर काढायला गेली होती. यावेळी हॉटेल शिवार गार्डनचे मालक शिवराज शिंदे, इतर दोन अनोळखी पुरुष आणी एक महिला तेथे दाखल झालो. शिवराज शिंदे याने मला सेक्स करायचे आहे चल येतीस का? अशी विचारणा करुन विनयभंग केला. यानंतर शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर इतर आरोपींनी तीचा हात धरुन तीला जबरदस्तीने हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.