Mojtaba Khamenei: “आम्ही शत्रूला सोडणार नाही अन् हक्कांचाही त्याग करणार नाही,” ; युद्धविरामानंतर मोजतबा खामेनी यांची पहिली प्रतिक्रिया
Mojtaba Khamenei: अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविरामानंतर, इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी आपले पहिले निवेदन जारी केले आहे.

Mojtaba Khamenei: अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविरामानंतर, इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी आपले पहिले निवेदन जारी केले आहे. त्यांनी, इराणला युद्ध नको आहे, पण ते आपले हक्कही सोडणार नाही. ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या शत्रूंना सोडणार नाही.” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना खामेनी यांनी,”जे इराणवर हल्ला करतील त्यांना ते सोडणार नाही. इराण आता पूर्वीसारखा देश राहिलेला नाही. इराण आता जगातील सर्वात मोठी शक्ती बनेल. इराणने युद्ध जिंकले आणि अमेरिकेला आपल्या अटी स्वीकारण्यास भाग पाडले. जर पुन्हा हल्ला झाला, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल” असे म्हणत त्यांनी त्यांच्या शत्रूला थेट इशारा दिला आहे.
पुन्हा हल्ला करण्यापूर्वी विचार करण्याचा इशारा Mojtaba Khamenei
पाकिस्तानमध्ये अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर, इराणचे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला इराणवर हल्ला करण्यापूर्वी दोनदा विचार करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, इराणने एक मोठी शक्ती बनण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीचा आपल्या फायद्यासाठी वापर करेल. आता पुरे झाले चांगुलपणा, आता आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पैसे कमवू. इराणला झालेल्या प्रत्येक नुकसानीची भरपाई शत्रूला करावी लागेल. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या रक्ताचा बदला घेतला जाईल.
इस्रायलला हल्ले थांबवण्याचा इशारा
दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी म्हटले आहे की, इस्रायलने लेबनॉनवर केलेले हल्ले थांबलेच पाहिजेत. लेबनॉनवर हल्ला करून इस्रायल शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. जर इस्रायलने माघार घेतली नाही, तर पाकिस्तानमधील चर्चा निष्फळ ठरतील.
इराणलाही या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यावे लागेल. अमेरिका आणि इस्रायलने हे लक्षात ठेवले पाहिजे की शस्त्रसंधी झाली आहे, परंतु इराणी सैन्य ट्रिगर दाबण्यासाठी सज्ज आहे. इराण कोणत्याही परिस्थितीत शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि फसवणूक सहन करणार नाही. (Mojtaba Khamenei)
इस्रायलवर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप Mojtaba Khamenei
पेझेश्कियन यांनी म्हटले आहे की, लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, १,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि लाखो लोकांना आपली घरे सोडून पलायन करण्यास भाग पाडले आहे.
एकीकडे अमेरिका शस्त्रसंधीचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे इस्रायल हल्ले करत आहे. जर इस्रायल इराणविरोधात अमेरिकेला पाठिंबा देत असेल, तर त्याने अमेरिकेच्या निर्णयालाही सहकार्य केले पाहिजे. तथापि, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू वेगळीच भूमिका घेत आहेत, ज्याची अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल.





