Mojtaba Khamenei In Coma: इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धाने जगाची कोंडी केली आहे. दरम्यान , या युद्धात दोन्ही बाजूचे नेते अधिकारी आणि निष्पाप नागरिक ठार झले आहेत. त्यातच आता, इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नुकतेच निवड झालेल्या मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे विविध माध्यमं आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन केले जात आहेत. हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी यांनी एक पाय गमावला असून, ते कोमात असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर मोजतबा यांच्या सोशल मीडियावरील खात्यावर देखील त्यांचा ‘एआय’निर्मीत फोटो वापरल्याचा दावा केला जात आहे. अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला त्याच हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा यांनी या हल्ल्यात एक पाय गमावला असून, सध्या ते कोमात आहेत, असे म्हटले आहे. पण, इराणी अधिकारी आणि सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मोजतबा सुरक्षित असून, सर्वोच्च नेत्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे इराणने म्हटले आहे. विविध माध्यमांचा दावा Mojtaba Khamenei In Coma: २८ फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात मोजतबा यांनी एक पाय गमावला असल्याचा दावा विविध माध्यमं करत आहेत. त्यांच्यावर तेहरानमधील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही सांगितले जात आहे. पण, याबाबत खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, विविध माध्यमांनी मोजतबा कोमात असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचा दावा केला आहे. Mojtaba Khamenei In Coma: पण, हा दावा देखील अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मोजतबा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. पण, इराणने मोजतबा सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर एआय फोटो? Mojtaba Khamenei In Coma “सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेला आणि त्यांच्या नव्या सोशल मीडिया खात्यावर वापरण्यात आलेला फोटो एआय निर्मित असल्याचे समोर आले आहे. गुगलच्या सिंथआयडीने याची पडताळणी केली असता त्यात वॉटरमार्क आढळतात, यामुळे फोटो तयार करण्यासाठी गुगल एआयचा वापर केल्याचे दिसून येते”, असे सांगण्यात येत आहे. “मोजतबा यांचा फोटो जुनाच असून, खूप वर्षापूर्वीचा असल्याचे दिसून येते. रिव्हर्स इमेजचा वापर करुन याची पडताळणी करता येते. फोटोच्या बॅकराऊंडही एडिट केल्याचे आणि एआयचा वापर करुन काढून टाकण्यात आले आहे”, असे शायन सरदारिझादेह यांनी पोस्ट म्हटले आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मोजतबा सार्वजनिक ठिकाणी अद्याप दिसून आलेले नाही, ते गंभीर जखमी आहेत किंवा मारले गेलेत”, असे मत नेटकऱ्यांनी नोंदवले आहे. मोजतबा यांचा संदेश काय? Mojtaba Khamenei In Coma: “या प्रदेशातील सर्व अमेरिकन हवाई तळ तात्काळ बंद करावेत, आखाती राष्ट्रांवर हल्ले सुरूच राहतील आणि या युद्धात मृत्यू पावलेल्या आमच्या नागरिकांचा बदला घेतला जाईल. तसेच इराणच्या शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील आणि शत्रूंकडून झालेल्या नुकसानाची तेहरान भरपाई घेईल, अन्यथा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करेल”, असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. मोजतबा यांचा हा संदेश इराणी सरकारी माध्यमांनी वाचून दाखवला आहे.