Mohan Bhagwat on Manipur। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत हे सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. दोन वर्षांपूर्वी मे २०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. इंफाळमधील एका कार्यक्रमात, मोहन भागवत यांनी सामाजिक सौहार्द आणि संस्कृती एकतेवर भर दिला. त्यांनी मणिपूरमध्ये सरकार स्थापनेबद्दलही भाष्य करत याठिकाणी एक सरकार असले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत” असे मोठे विधान केले आहे. मणिपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात एका प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना, “मी सरकार आणि पक्षांच्या कारभारात जास्त हस्तक्षेप करत नाही. परंतु, मणिपूरमध्ये एक सरकार असले पाहिजे. माझ्या माहितीनुसार, यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत.” असे महत्वाचे विधान त्यांनी केले. अंतर्गत शांततेसाठी वेळ लागेल Mohan Bhagwat on Manipur। ते म्हणाले, “विनाशासाठी दोन मिनिटे लागतात, परंतु बांधकामासाठी दोन वर्षे लागतात. या कठीण परिस्थितीतही, मणिपूरच्या लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी विभाजित होऊ नये म्हणून सतत प्रयत्न केले जात आहेत. आम्ही निश्चितच सर्वांना सोबत घेऊन जाऊ.” भौतिक बाबींमध्ये शांतता लवकरच प्रस्थापित होईल, कोणाचीही ओळख इत्यादींना हानी पोहोचणार नाही. तथापि, आंतरिक शांतीला थोडा वेळ लागेल. आम्हाला याची जाणीव आहे. संघाची तुलना कोणाशीही करता येणार नाही दरम्यान , इम्फाळमधील एका सभेला संबोधित करताना भागवत यांनी, देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैनंदिन चर्चेचा विषय राहिला आहे. पूर्वग्रह आणि प्रचार अनेकदा समोर येतो. संघाचे कार्य अतुलनीय असल्याचे वर्णन करताना ते म्हणाले, “जसे समुद्र, आकाश आणि महासागर यांची तुलना नाही, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना कोणत्याही संघटनेशी करता येणार नाही.”असेदेखील म्हटले आहे. सामाजिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत Mohan Bhagwat on Manipur। भागवत यांनी मणिपूरच्या मजबूत सांस्कृतिक परंपरांचे कौतुक केले, ज्यामध्ये विशेष प्रसंगी पारंपारिक पोशाख घालणे आणि स्थानिक भाषा वापरणे यांचा समावेश आहे. त्यांनी या परंपरांना बळकटी देण्यास प्रोत्साहन दिले. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल भागवत म्हणाले की, स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी सामुदायिक आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मे २०२३ पासून मणिपूरमध्ये कुकी-झो आणि मेइतेई समुदायांमधील संघर्षात किमान २६० लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.