भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मोहम्मद शमी शेवटचा वनडे वर्ल्डकप 2023 खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नोव्हेंबर 2023 पासून मोहम्मद शमी मैदानापासून दूर आहे. जवळपास 9 महिन्यांच्या कालावधीनंतर शमीने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत तो सराव करताना दिसत आहे. ‘या’ सामन्यातून करणार मैदानात पुनरागमन मोहम्मद शमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत हंगामासाठी बंगालच्या 31 सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच मोहम्मद शमी रणजी स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. शमी 11 ऑक्टोबरला युपी विरुद्ध रणजी स्पर्धेत उतरू शकतो किंवा 18 ऑक्टोबरला बिहार विरुद्ध होणाऱ्या सामन्यात दिसू शकतो. शमी लवकरच टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच 19 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. या तीन कसोटींपैकी कोणत्याही मालिकेतून तो पुनरागमन करू शकतो. रणजी ट्रॉफी 2024-25 साठी बंगालचा संभाव्य संघ अभिमन्यू ईश्वरन, अनुस्तुप मजुमदार, ऋद्धिमान साहा, सुदीप कुमार घरामी, सुदीप चॅटर्जी, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रिटिक चॅटर्जी, सौरव पॉल, शुवम डे, अंकुर पॉल, अवलिन घोष, प्रदिपता यामानिक, विभव कुमार, विभान कुमार, ए. गनी, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, आकाश दीप, सूरज सिंधू जयस्वाल, मोहम्मद कैफ, रवी कुमार, रोहित कुमार, सय्यद इरफान आफताब, युधाजित गुहा, अनंता साहा, गीत पुरी, प्रीतम चक्रवर्ती, सौम्यदीप मंडल, ऋषव विवेक, सुमित मोहंता.