Mohammad Rizwan Sledging Video Viral : मैदानावर चपळ हालचाली आणि दमदार फलंदाजीसाठी ओळखला जाणारा पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. बांगलादेशविरुद्धच्या मीरपूर कसोटीत पाकिस्तानचा पराभव झालाच, पण त्याहून अधिक चर्चा ही रिझवानच्या अपमानाची आणि त्याच्या विचित्र पद्धतीने बाद होण्याची होत आहे. मैदानावर बांगलादेशच्या यष्टीरक्षकाने त्याला दिलेल्या टोमण्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आहे. मैदानावर झाला रिझवानचा अपमान (Mohammad Rizwan Sledging) सामन्याच्या दुसऱ्या डावात २६८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ५ बाद १२१ अशी बिकट झाली होती. पहिल्या डावात ५९ धावा करणाऱ्या रिझवानवर संघाला सावरण्याची मोठी जबाबदारी होती. रिझवान आणि सौद शकील जोडी जमवण्याचा प्रयत्न करत असतानाच, बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दासने मानसिक दबाव टाकण्यासाठी स्लेजिंगचा आधार घेतला. लिटन दास फिरकीपटू तैजुल इस्लामशी बंगाली भाषेत संवाद साधत असताना म्हणाला की, “याला (रिझवानला) पाकिस्तानमध्ये अजिबात इज्जत दिली जात नाही. जर हा मोठा फटका मारून बाद झाला, तर त्याला मायदेशी परत जाता येणार नाही, इतकी त्याची प्रतिमा खराब आहे.” विचित्र पद्धतीने झाला बाद – (Mohammad Rizwan Sledging) ILitton to Taijul: “Rizwan’s reputation is really bad back in Pakistan. If he gets out trying to hit a big shot, he won’t even be able to set foot back in the country-his reputation is that bad!” 🤣☠️ LOL Litton Das is trolling the hell out of Rizwan🤣🤣.#BanvsPak pic.twitter.com/aiwMUzpGPo — ᴿʸᴬᴺ ᴿᴬᴴᴹᴬᴺ🇧🇩 (@oiiii_butch) May 12, 2026 Massive breakthrough! Mohammad Rizwan departs. Cleaned up by Nahid Rana. #BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #Tigers pic.twitter.com/kK5K1t2bG9 — Bangladesh Cricket (@BCBtigers) May 12, 2026 लिटन दासचे हे शब्द रिझवानला समजले की नाही हे स्पष्ट नसले तरी, त्यानंतर लगेचच जे घडलं ते धक्कादायक होतं. वेगवान गोलंदाज नाहिद राणाचा एक चेंडू आत येत असताना रिझवानने तो सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि बॅट वर केली. मात्र, चेंडूने चकाकणारी दिशा बदलली आणि थेट त्याचा त्रिफळा उडवला. आपण नक्की कसे बाद झालो, हे पाहून रिझवान स्वतःही अवाक झाला. हेही वाचा – Pat Cummins Fined : हैदराबादला दुहेरी फटका! पराभवानंतर आता बीसीसीआयने पॅट कमिन्सला ठोठावला दंड; नेमकं कारण काय? चाहत्यांच्या टीकेचा भडिमार – (Mohammad Rizwan Sledging) रिझवान अवघ्या १५ धावांवर बाद झाला आणि संपूर्ण पाकिस्तान संघ १६३ धावांत गारद होऊन १०४ धावांनी पराभूत झाला. फलंदाजीसोबतच रिझवानने सामन्यात केलेल्या खराब यष्टीरक्षणामुळे पाकिस्तानी चाहते त्याच्यावर तुटून पडले आहेत. स्वतःच्या देशात ट्रोल होत असताना आता शेजारील देशाच्या खेळाडूंनीही त्याची खिल्ली उडवल्याने रिझवानची मोठी नाचक्की झाली आहे.