मोदींच्या ‘स्पीडब्रेकर दीदी’ टीकेला ममतांचे ‘एक्सपायरी बाबू’ने प्रतिउत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सिलिगुरी येथे बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. पंप्रधानांनी यावेळी सिलिगुरी येथील जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना म्हंटले होते की, “पश्चिमबंगालच्या विकासामध्ये ममता बॅनर्जी यांनी एखाद्या स्पीडब्रेकर प्रमाणे काम केले असून त्यामुळेच पश्चिम बंगालचा विकास मंदावला आहे.”

दरम्यान, पंतप्रधानांच्या या टीकेचा खरपूस समाचार ममता बॅनर्जी यांनी घेतला असून त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक्सपायरी बाबू आहेत, त्यांचं सरकार देखील एक्सपायर झालं आहे. पंतप्रधान सिलिगुरी येथे येऊन आज सांगतात की आम्ही येथील गरीब जनतेसाठी काहीही केलं नाही, मी मोदीजींना विचारते तुम्ही गेल्या पाच वर्षात काय केलं? मोदीजी रोज खोटं बोलण्याची सवय सोडून द्या.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.