Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पदासाठी विविध नेत्यांची नावे पुढे येत असताना, खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचा दावा काही दिवसांपासून केला जात होता. मात्र, स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे या चर्चांना तात्पुरता विराम मिळाला. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे. Sunetra Pawar अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यात या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवारांना दिल्लीचे आमंत्रण : दरम्यान, अजित पवारांचे अंत्यविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून दिल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे पुढील काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे देखील वाचा : Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली मोदी-शाहांशी भेट; बंद दाराआड झाली महत्वाची चर्चा…